मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (22:18 IST)

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता

कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काहीशी शिथिलता असली तरी मुंबईसारख्या रेड झोनमध्ये कडक निर्बंध आहेत. टाळेबंदीत सर्वच शूटिंग्जना बंदी घालण्यात आली आहे. पण टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार पहिला अभिनेता ठरला आहे. या सेटवरील शुटिंगचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 
 
दोन महिन्यानन्तर अक्षय कुमार शूटिंगसाठी सेटवर अवतरला. अक्षय कुमारने कोरोनाविषयी बरीच जनजागृती केली आहे. कोरोनविषयक केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती त्याने सर्वसामान्यांना दिली आहे. आताही तो केंद्र सरकारच्या एका अभियानाच्या शूटिंगसाठी सेटवर आला. कमलीस्तान स्टुडियोमध्ये हे शूटिंग सुरू आहे. आर. बलकिने याचे दिग्दर्शन केले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे शूटिंग करण्यात आले आहे. सामाजिक अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन हे शूटिंग झाले. या शूटिंगसाठी पोलीस आणि महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आली.