शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (08:54 IST)

खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू असून रोजच कोरोना रुग्ण वाढत लॉकडा. लॉकडाऊन या काळात खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार आहे. या जोडप्यांची गाडी जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून काही भाविक आणि नवविवाहित जोडपी खाजगी वाहनांनी जेजुरीला येत असल्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 
 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशातील देवस्थानं बंद करण्यात आली आहेत. खंडोबा मंदिर आणि पायरी मार्ग बंद असतानाही काही भाविक आणि नव दाम्पत्य पहिल्या पायरीचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीला येत आहेत. यात रेड झोनमधल्या भाविकांचाही समावेश आहे. त्यामुळे जेजुरीच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापुढे दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं वाहन जप्त केलं जाईल आणि अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.