मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (18:43 IST)

चांगली बातमी : आता 30 जून पर्यंत ATM मधून पैसे काढण्यासाठी चार्ज नाही

कोरोना विषाणूंचा संसर्गाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आपल्या ग्राहकांना भेट देण्यात येत आहे. बँकांनी येत्या 30 जून पर्यंत फ्री ट्रांजेक्शन 5 वेळाहून अधिक असल्यास लागणाऱ्या शुल्काला माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती बँकेने आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.
 
बँकेनुसार 24 मार्च रोजी अर्थमंत्री यांनी केलेल्या घोषणेच्या विचार करून SBI ने हा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की एटीएम कार्ड बाळगणाऱ्या धारकांसाठी ही चांगली बातमी आहे ! SBI ने 30 जून पर्यंत फ्री ट्रांजेक्शन 5 वेळेपेक्षा जास्त असल्यावरही कोणते ही शुल्क न घेण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
 
RBI चे नियम काय आहेत : 
RBI च्या नियमानुसार एटीएम कार्ड धारकांना दर महिन्यात 5 ट्रांजेक्शनसाठी कोणते ही शुल्क आकारण्यात येत नाही. पण सहाव्या ट्रांजेक्शनसाठी बँक शुल्क आकारते.
तसं तर IBI (आय बी आय) ने बँकांना असे ही स्पष्टीकरण दिले आहेत की नॉन-कॅश ट्रांजेक्शन जसे की बॅलन्स चेक, फ़ंड ट्रान्स्फर, ला ए.टी.एम. ट्रांजेक्शन मानू नये.