सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (13:48 IST)

6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका: सर्व्हे

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर लस शोधण्याचे काम सुरु आहे तसेच जगभरातील शास्त्रज्ञ या विषयावर शोध घेत आहे. दरम्यान कोरोनाची लागण 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये होण्याचा धोका जास्त आहे असे एका अभ्यासात दिसून आले. 
 
मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने अमेरिका आणि ब्रिटनमधील सुमारे 2000 लोकांचा सर्वेक्षण करण्यात आले. यात  संशोधकांना असे आढळले की 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्गाचा धोका जास्त असतो.
 
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की केवळ ड्रॉपलेटच खालून पसरत नाही तर त्यांचा संसर्ग हा हवेतूनही होऊ शकतो. ड्रॉपलेटमुळे सध्या सर्वाधिक लोकं संक्रमित होत असल्याचे समोर आले आहे. 
 
लोकांच्या पर्सन प्रोफाइल जसे की काम आणि घरामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? यावर शोध घेण्यात येत असताना हे समोर आले आहे.