मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (10:05 IST)

बरे झालेले रुग्ण १०,३३३; नवीन रुग्ण ७७१७,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६० टक्क्यांवर

राज्यात आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे. तर आज ७७१७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४४  हजार ६९४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ नमुन्यांपैकी ३ लाख ९१  हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह (१९.८८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८५ हजार ५४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ७३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.