बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (09:39 IST)

कोरोनाच्या १७ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात गुरुवारी ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के एवढा आहे.