गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (21:05 IST)

घरात बसून पीएफचे पैसे काढण्याचा हा एक सोपा मार्ग जाणून घ्या, रक्कम बँक खात्यात येईल

जेव्हा आपण संपूर्ण महिना काम करतो, तेव्हा आपल्याला पगाराच्या रूपात पैसे मिळतात. आमचा पगार हातात मिळणाऱ्या पैशां पेक्षा आपला पगार जास्त असतो, पण आपल्या  पगाराचा काही भाग दरमहा वैद्यकीय विमा, ईएसआय आणि पीएफ सारख्या गोष्टींसाठी कापला जातो. जर आपण पीएफ बद्दल बोललो तर दरमहा जमा केलेले पैसे आपल्या पगारातून आणि आपल्या कंपनीच्या वतीने आपल्या  पीएफ खात्यात जमा केले जातात .नंतर ते पैसे आपण आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. आता आपण घरी बसल्या ऑनलाईनद्वारे PF साठी अर्ज करू शकता. आणि पी एफ चे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.या साठी आपल्याला काही सोप्या प्रक्रियेचे अवलंब करावे लागणार.चला तर मग जाणून घेऊया त्या सोप्या प्रक्रियेबद्दल.
 
ही आहे प्रक्रिया: -
* जर आपला पीएफ कापला जातो, तर सर्वप्रथम आपल्याला आधी https: unifiedportal mem.epfindia.gov.in वेबसाइटवर जावे लागेल. हे पीएफ डिपार्टमेंटचे अधिकृत संकेतस्थळ आहे. जिथे आपल्याला यूएन नंबर आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल.
 
* आता आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसवर जावे लागेल आणि क्लेम (फॉर्म 31, 19, 10 सी आणि 10 डी) वर क्लिक करावे लागेल.
 
*  यानंतर आपल्याला  UN लिंक केलेला बँक खाते क्रमांक विचारला जाईल, जो इथे भरावा लागेल नंतर  Verify वर क्लिक करा.
 
* बँक खात्याची पडताळणी केल्यानंतर, आपल्याला  'सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग' अप्रूव्ह करणे आवश्यक आहे आणि नंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा.
 
*  आता इथे आपल्याला पीएफ काढण्याचे कारण निवडावे लागेल आणि त्यानंतर आपल्याला आपला संपूर्ण पत्ता भरावा लागेल.
 
* त्यानंतर आपल्याला चेक किंवा बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत इथे अपलोड करावी लागेल.
 
*  यानंतर  अटी आणि शर्त असलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि गेट आधार ओटीपी वर क्लिक करा, हा ओटीपी आपल्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल.
 
* आता ओटीपी टाकावा लागेल आणि नंतर सबमिट करावा लागेल, काही दिवसांनी पीएफचे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात येतील.