मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (19:58 IST)

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2022 : पात्रता, उद्देश्य, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2022  : प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना दररोज कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो .कधी दुष्काळ तर कधी महापुराचा सामना शेतकरी बांधवाना करावाच लागतो. महाराष्ट्रातील अल्पभूधारक  शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे . या योजनेंतर्गत दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 अंतर्गत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची पेरणी आणि लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्यांबाबतही मदत केली जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे,जेणेकरून शेतकरी सहज शेती करू शकेल आणि आपले उत्पन्न वाढवू शकेल. आणि आपले उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकेल.
या योजनेंतर्गत लागवडीसाठी जमिनीच्या मातीचीही चाचणी केली जाईल आणि   त्याअंतर्गत खनिजांची कमतरता भरून काढली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या भागात शेती करणे शक्य होणार नाही अशा सर्व भागात शेळीपालन युनिट स्थापन केले जाणार  जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तलावांचे उत्खनन आणि मत्स्यपालन युनिटची स्थापना देखील या योजने अंतर्गत केली जाते. सिंचनाच्या पाण्याची कमतरता असलेल्या सर्व भागात ठिबक सिंचन चालविण्याची तरतूद केली जाणार. या योजनेनुसार शेतकऱ्यांना स्प्रिंकलर संचाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूदही करण्यात येणार आहे.
नानाजी देशमुख योजनेमध्ये राज्यातील अशा ग्रामीण क्षेत्रांना शामिल केले गेले आहे, जेथे पाण्याचा दुष्काळ आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी आपल्या शेतीत सिंचन व्यवस्था उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त क्षेत्रातील गावांना योजनेत शामिल करून त्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध केली जाते.
योजनेचे लाभ- 
* कृषी संजीवनी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
* जे शेतकरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत नोंदणी करतील , त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम राज्य सरकार करणार आहे.
* या योजनेसाठी सरकारने 4000 रुपयांचे बजेट निश्चित केले असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
शेतकऱ्यांना सहज शेती करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे. 
 
* योजनेतील प्रकल्प
* वर्मी कंपोस्ट युनिट
* स्प्रिंकलस सिंचन प्रकल्प
* ठिबक सिंचन प्रकल्प
* बियाणे उत्पादन युनिट
* फॉर्म पॉन्डास अस्तर
* पाण्याचा पंप
* हॉर्टिकल्चर अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प
* तलावाचे शेत
* शेळी पालन युनिट ऑपरेशन
* लहान रुमिनंट प्रकल्प
 
पात्रता -
* महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
* या योजनेचा लाभ फक्त लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांनाच देता येईल.
* नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
 
आवश्यक कागदपत्रे
* आधार कार्ड
* पत्त्याचा पुरावा
* ओळखपत्र
* मोबाईल नंबर
* पासपोर्ट आकाराचा फोटो
 
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया -
* सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइटला mahapocra.gov.in/भेट द्यावी लागेल. यानंतर वेबसाइटचे होमपेज  ओपन होईल.
* वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला “ अॅप्लिकेशन फॉर्म PDF ” डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल . तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची PDF डाउनलोड होईल.
* तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक आणि फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील योग्यरित्या भरावे लागतील.
* आता तुम्ही प्रविष्ट केलेली माहिती तपासल्यानंतर, तुम्हाला या फॉर्मसह आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवावी लागतील
 
गावांची यादी पाहण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेमध्ये सामील सर्व ग्रामीण परिसराची यादी पाहण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला mahapocra.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.आणि नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यादीच्या 5142 गावांच्या यादीवर क्लिक करून गावांची यादी पाहू शकता. 
 
प्रोग्रेस रिपोर्ट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेजवर गेल्यावर प्रोग्रेस रिपोर्ट ऑप्शन वर क्लिक करून माहिती मिळवून घेता येईल.
 
टेंडर डाउनलोड करण्यासाठी  या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेज उघडल्यावर टेंडर ऑप्शन वर क्लिक करून माहिती उपलब्ध होईल. 
 
योजनेची विविध बुकलेट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर होमपेज उघडेल त्यावर व्हेरियस बुकलेट्स ऑफ द प्रोजेक्ट ऑप्शन वर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकाल.  
 
वेदर अडवाईज जाणून घेण्यासाठी -सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून मुखपृष्ठ ओपन होईल नंतर त्यामध्ये 'वेदर अडवाईज' या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल आणि जिल्ह्याची निवड करून तारीख या पर्यायावर तारखेची निवड करावी लागेल. नंतर त्यावरून वेदर अडवाईज माहिती मिळू शकेल.