बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (19:37 IST)

Bank of Baroda Recruitment 2022: बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, 19 जुलैपर्यंत अर्ज करा

bank of baroda
Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदाने चार्टर्ड अकाउंटंट स्पेशलिस्ट ऑफिसरच्या नियमित पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 19 जुलै 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर भरतीसाठी अर्ज करू शकतात.
 
या भरती मोहिमेद्वारे एकूण 15 पदे भरायची आहेत, त्यापैकी 4 पदे सिनिअर मॅनेजर बिझिनेस फायनान्स, 4 पदे चीफ मॅनेजर बिझिनेस फायनान्स , 2 पदे सिनिअर मॅनेजर इंटर्नल कंट्रोल , 3 पदे चीफ मॅनेजर इंटर्नल कंट्रोलसाठी आहेत. याशिवाय 1 पद सिनिअर मॅनेजर फायनेन्शियल अकाउंटिंग आणि 1 पद चीफ मॅनेजर फायनेन्शिअल अकाउंटिंग चे आहे
 
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 28 वर्षे आहे, तर कमाल वय 38 वर्षे आहे. त्याच वेळी, काही पदांसाठी कमाल वय 40 वर्षे आहे. वयाची गणना 1 जून 2022  आधारे केली जाईल.
 
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर (कोणत्याही शाखेतील) आणि चार्टर्ड अकाउंटंट.असावा.अधिक माहितीसाठी तपशील बघावा.
 
अर्ज फी
सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 600 आहे, तर SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांसाठी / अपंग व्यक्ती (PWD) / महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 100 आहे.
 
अर्ज करण्याची पायरी
* प्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
* येथे मुख्यपृष्ठावर, “वर्तमान संधी” वर क्लिक करा.
* चार्टर्ड अकाउंटंट स्पेशालिस्ट ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिसच्या भर्ती अंतर्गत “आता अर्ज करा” वर क्लिक करा.
* आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
* भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.