गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : रविवार, 6 जुलै 2025 (11:00 IST)

आषाढी एकादशीला विठ्ठालासाठी तयार करा आंबा पेढा प्रसाद

Mango Peda Recipe in marathi
साहित्य:
२ केसर आंबे
पाव ग्राम मावा
१ टीस्पून मँगो ईमलशन (ऐच्छिक)
१ कप साखर
१/२ टेबलस्पून साजूक तूप
 
कृती:
सर्वात आधी केसर आंब्याचा रस काढून त्यात अर्धा कप साखर टाकून फिरवून घ्या.
मावा किसणीने किसून घ्या.
आता नॉनस्टिक कढईत तूप टाकून आंब्याचा रस टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावा.
आंब्याचा रस पूर्ण शिजेपर्यंत त्याला सतत हालवत राहा.
पूर्ण पाण्याचे प्रमाण आटेपर्यंत रस मॅंगो इमल्शन टाकून घ्यावा.
नंतर त्यात किसलेला मावा टाकून मिक्स करा
उरलेली अर्धा कप साखर पण टाकून घ्या आणि एक सारखे हलवून भाजून घ्या.
भाजून झाल्यावर मिश्रण पसरून थंड करून घ्या.
हाताने वळून पेढे तयार करा.
 
 
साधा पेढा बनवण्याची सोपी कृती:
साहित्य:
१ कप खवा (मावा)
१/२ कप साखर (चवीनुसार)
१/४ चमचा वेलची पूड (ऐच्छिक)
पिस्ता किंवा इतर सुका मेवा (सजावटीसाठी)
 
*******************************************
कृती:
एका भांड्यात खवा आणि साखर घ्या.
मंद आचेवर दोन्ही चांगले मिक्स करून घ्या.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड टाका.
पुन्हा चांगले मिक्स करून घ्या.
हे मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडेसे तूप हाताला लावा.
आता या मिश्रणाचे लहान गोळे तयार करा.
गोळ्यांना हाताने दाबून पेढ्याचा आकार द्या.
तयार पेढ्यांना पिस्ता किंवा इतर सुक्या मेव्याने सजवा. 
 
टीप:
जर मिश्रण जास्त पातळ झाले, तर थोडे खवा (मावा) आणखी मिसळा.
पेढे बनवताना मिश्रण थंड झाल्यावरच पेढे वळावेत, म्हणजे ते हाताला चिकटणार नाहीत.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
पेढे बनवताना तुम्ही त्यात जायफळ किंवा इतर सुवासिक मसाले देखील घालू शकता.