1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 23 जून 2025 (16:48 IST)

जिलेबी खाण्याचे फायदे माहित आहेत का? रसभरीत Jalebi आहारात सामील करा

रसभरीत गरमागरम जिलेबी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं पण गोड पदार्थ खाणे टाळायचे म्हणून ड्रायफ्रूट्स मिठाईकडे वळलेले लोक या युगात अपचन किंवा लठ्ठपणा वाढेल या भितीने जिलेबी खाणे टाळतात. पण आपल्याला माहित आहे का की जिलेबी आमच्यासाठी किती फायद्याची ठरु शकते. 
 
जिलेबी खाण्याचे फायदे:
त्वरित ऊर्जा: जिलेबीमध्ये साखर आणि मैदा असल्याने ती कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास ती उपयुक्त ठरू शकते. सकाळी याचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जावान राहण्यास मदत होते.
 
औषध: आयुर्वेदानुसार, जिलेबी केवळ गोडच नाही तर एक औषध देखील मानली जाते. बद्धकोष्ठता, जलोदर, डोकेदुखी, मायग्रेनसाठी जिलेबी हा सर्वोत्तम उपचार आहे.
 
दम्याचा उपचार: गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने दमा, सर्दी आणि खोकला देखील बरा होतो. त्यामुळे मन एकाग्र होण्यास देखील मदत होते.
 
मूड सुधारणे: गोड पदार्थ खाल्ल्याने मेंदूत सेरोटोनिन नावाचे रसायन तयार होते, जे मूड सुधारण्यास आणि आनंदाची भावना निर्माण करण्यास मदत करते.
 
पचनास प्रोत्साहन (मर्यादित प्रमाणात): जिलेबी तुपात तळलेली असते, जे आयुर्वेदानुसार मर्यादित प्रमाणात पचनास मदत करू शकते. दूध आणि जलेबीचे मिश्रण सेवन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
 
जिलेबी रेसिपी
साहित्य:
१ वाटी मैदा
२ चमचे कॉर्नफ्लोर
१/४ चमचा बेकिंग पावडर
१/२ वाटी दही
पाणी (गरजेनुसार)
केशर (थोडे धागे, पर्यायी)
१ चिमूट पिवळा रंग (पर्यायी)
तळण्यासाठी तेल किंवा तूप
 
साखरेचा पाक:
१.५ वाटी साखर
१ वाटी पाणी
१/४ चमचा वेलची पावडर
१ चमचा लिंबाचा रस
केशर (पर्यायी)
 
कृती:
एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोर आणि बेकिंग पावडर मिक्स करा.
त्यात दही घाला आणि हळूहळू पाणी मिसळत पिठ भिजवा. पिठ जास्त पातळ किंवा जाड नसावे, स्मूथ व्हायला हवे.
पिठ झाकून १२-२४ तास आंबवण्यासाठी ठेवा (उन्हाळ्यात १२ तास पुरेसे).
साखरेचा पाक तयार करणे:
एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून उकळी येईपर्यंत गरम करा.
साखर पूर्ण विरघळल्यानंतर वेलची पावडर, केशर आणि लिंबाचा रस घाला.
एकतारी पाक (जेव्हा बोटांमध्ये चिकटतो तेव्हा) तयार झाला की गॅस बंद करा.
जिलेबी तळणे:
आंबवलेले पिठ हलक्या हाताने मिक्स करा. गरज पडल्यास थोडे पाणी घाला.
पिठ एका सॉस बाटलीत किंवा पिठाच्या पिशवीत (टोकाला छोटे छिद्र) भरा.
कढईत तेल किंवा तूप गरम करा (मध्यम आच).
पिठ गोलाकार फिरवत जिलेबीच्या आकारात तेलात सोडा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
पाकात बुडवणे:
तळलेल्या जिलेब्या गरम पाकात १-२ मिनिटे बुडवून काढा.
अतिरिक पाक झटकून टिश्यू पेपरवर ठेवा.
गरमागरम जिलेबी रबडी किंवा दूधासोबतही खाऊ शकता.
 
टिप्स- पिठ चांगले आंबवले तर जिलेबी खुसखुशीत होते.
पाक गरम असावा, पण खूप उकळता नसावा.
तळताना तेल खूप गरम नसावे, नाहीतर जिलेबी कच्ची राहील.
 
मात्र जिलेबी खाण्याचे काही नुकसान देखील आहे ते देखील जाणून घ्या-
जिलेबीमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढणे, मधुमेह किंवा हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
जास्त प्रमाणात जिलेबी खाल्ल्याने अपचन, पोटदुखी किंवा जडपणा जाणवू शकतो.
जास्त साखरेमुळे दातांना कीड लागण्याचा धोका वाढतो, विशेषतः जर तोंडाची स्वच्छता ठेवली नाही.
मधुमेहींसाठी जिलेबी हानिकारक ठरू शकते, कारण ती रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवते.
जिलेबीचा आनंद घ्यावा, पण मर्यादित प्रमाणात आणि संतुलित आहारासह. मधुमेही, वजन नियंत्रण करणारे किंवा हृदयरोग असलेल्यांनी ती खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही. या संदभार्त अचूक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.