सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (22:35 IST)

आधार कार्डलाही असते एक्सपायरी डेट, तुम्ही तुमचा युनिक नंबर देखील तपासू शकता

आजच्या तारखेत आधार हे आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत त्याची गरज आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार कार्ड जारी करते. यामध्ये तुमच्या ओळखीची प्रत्येक माहिती असते, जी  तुमच्या आधारवर लिहिलेल्या युनिक नंबरच्या मदतीने कोणतीही संस्था पाहू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की, आधारची एक्सपायरी डेटही असते? तुमचा आधार किती दिवस वैध आहे हे तुम्ही सहज तपासू शकता.  
 
 नाव, वय आणि पत्ता ते बायोमेट्रिक्सपर्यंतची माहिती आधारमध्ये नोंदवली जाते. आजकाल प्रत्येक आर्थिक कामात आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळेच  आपला आधार किती काळ वैध आहे हे जाणून घेतले पाहिजे. आधार कार्ड एखाद्या व्यक्तीला आयुष्यात एकदाच  दिले जाते. जर पॅनकार्डसारखी कागदपत्रे तुमच्या आधारशी लिंक केलेली नसतील तर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
 
तुमच्या आधारची वैधता कशी तपासायची  
तुम्ही तुमच्या आधारची वैधता ऑनलाइन सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर आधार सेवा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Verify Aadhaar Number या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.  
 
तेथे तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर, बॉक्समध्ये सुरक्षा कोड भरा. त्यानंतर Verify या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक वैध असेल तर तुम्हाला तो दिसेल. जर तुमचा आधार कालबाह्य झाला असेल, तर आधार क्रमांक दिसणार नाही.
 
आधार कालबाह्य कसा होतो?  
तुमच्या मुलांसाठी बनवलेले ब्लू आधार कार्ड असेल तर ते पाच वर्षांनी संपेल. त्याच वेळी, पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 15 वर्षांच्या मुलांचे आधार वेळेत अपडेट न केल्यास ते कालबाह्य होऊ शकते. त्यामुळे आधारमधील बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे.
 
असे नूतनीकरण करा  
तुम्ही कालबाह्य झालेले आधार कार्ड रिन्यू करू शकता. तुम्हाला ते अपडेट करावे लागेल. UIDAI फक्त पाच वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या बायोमेट्रिक डेटा अपडेट   करण्यास सांगते. बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे तुमचे बायोमेट्रिक तपशील जसे फिंगरप्रिंट, बुबुळ आणि छायाचित्र अपडेट केले जातील. यासोबतच तुम्ही जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल देखील अपडेट करू शकता.