गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (18:57 IST)

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास सरकार मदत देणार? वाचा या योजनेची सर्व माहिती

death
कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून कर्तेपण निभावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबाचा गाडा चालवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कुटुंबाला सहाय्यकारी ठरेल अशी योजना तयार केली आहे.
 
केंद्र सरकारतर्फे अशा कुटुंबाला 20 हजार रुपयांची मदत केली जाते. 'नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम' असं या योजनेचं नाव आहे.
 
या योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी काय निकष आहेत, काय कागदपत्रं सादर करावी लागतात, नक्की कोणत्या कुटुंबांना मदत केली जाते हे सगळं समजून घेऊया.
 
योजना काय आहे?
कुटुंबातील प्रमुख कमावत्या माणसाचं अचानकच निधन झाल्यास केंद्र सरकारतर्फे 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे.
 
मृत्यू नैसर्गिक झाल्यास मदत मिळणार का?
कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कसाही झाला तरी कुटुंबाला मदत मिळणार आहे.
 
प्रमुख कमावणारी व्यक्ती पुरुष असो की स्त्री- मदत पुरवली जाईल.
 
गृहिणीचा मृत्यू झाल्यास?
कुटुंबातील प्रमुख कमावत्या माणसाचं अचानकच निधन झाल्यास केंद्र सरकारतर्फे 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे.
 
मृत्यू नैसर्गिक झाल्यास मदत मिळणार का?
कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कसाही झाला तरी कुटुंबाला मदत मिळणार आहे.
 
प्रमुख कमावणारी व्यक्ती पुरुष असो की स्त्री- मदत पुरवली जाईल.
 
गृहिणीचा मृत्यू झाल्यास?
परिचयपत्र
वास्तव्याचा पुरावा
आधार लिंक बँक अकाऊंट डिटेल्स
मोबाईल नंबर
आधार कार्ड
कुटुंबप्रमुखाचा वयाचा पुरावा
अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
मृत व्यक्तीसंदर्भातील कोणती कागदपत्रं द्यावी लागतील?
मृत्यूचा दाखला
परिचयपत्र किंवा आधार कार्ड
वास्तव्याचा दाखला
पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड
मदत कशी मिळेल?
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदत रक्कम थेट जमा करण्यात येईल.
 
कोऑपरेटिव्ह बँकेत खातं असल्यास मदत मिळेल का?
खात्यात मदत रक्कम जमा होण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे.
 
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे हे कळवण्याची जबाबदारी कुणावी?
ज्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळवायची आहे त्याने यासंदर्भात संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला संपर्क करावा.
 
कोण या योजनेसाठी लागू आहे?
अर्ज करणारा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली असणं अपेक्षित आहे.
अर्ज करणारा व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असावा.
आई-वडील दोघेही कमावते आहेत. आईचं उत्पन्न वडिलांपेक्षा जास्त आहे. आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. अशा कुटुंबाला मदत मिळेल का?
आईची नोंद कुटुंबप्रमुख अशी होऊन त्या कुटुंबाला मदत मिळेल.
 
लाभार्थीची निवड कशी केली जाते?
जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवर निवडसमितीची स्थापना केली जाईल. अर्जदाराने केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल.
 
अर्ज विहित निकषांमध्ये बसत असेल तर संबंधित अर्जदाराला मदत मिळेल.
 
लाभार्थींची निवड ग्रामपंचायतीद्वारे केली जाईल.
 
अर्ज कुठे करावा?
योजनेअंतर्गत पैसे मिळावेत यासाठी जवळच्या सेवा केंद्रात तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.
 
अर्ज डाऊनलोड करावा. तो अर्ज भरुन जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे द्यावा.
 
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
अर्ज या लिंकवर उपलब्ध आहेत.
 
योजना तसंच अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करावा?
अधिक माहितीसाठी जवळच्या सामाजिक कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
Published By -Smita Joshi