गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (16:02 IST)

‘हग’डे स्पेशल कविता

प्रत्येक क्षणी भेटण्यास आतुर जिवलगा तुज रे,
वाटे तुजसी येउन बिलगवे, की काय करावे!
ओढ ही मज तुझ्याकडे ओढी सतत,
अंतर कटेना हे, हीच मोठी खंत,
विसावेन म्हणते तुझ्या आश्वस्त मिठीत,
कल्पनाच किती वाटे कित्ती सुखद, अवीट,
कल्पनेत ठेवते, त्यास लपेटून अलगद,
भेटताच तुज उलगडेल, सत्य हेंच निर्विवाद !
...अश्विनी थत्ते