सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (13:45 IST)

Propose Day 2023 माझी होशील का?हीच इच्छा ग अंतरंगातली

सांगूनच देतो म्हटलं एकदाच, माझ्या  घालमेल मनातली,
माझी होशील का?हीच इच्छा ग अंतरंगातली.
न लागते भूक, न लागे तहान ग मजला,
कसा न कळला जीव माझा तुझ्यात गुंतला,
हो म्हण अथवा नाही,  ठरव  तू तुझं,
तुझ्याच उत्तरावर ठरणार भवितव्य माझं,
पण सांगतो शपथेवर, देईल साथ सुखदुःखात,
दे हात हातात, करू या नवी सुरवात!
...अश्विनी थत्ते.