रविवार, 21 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (07:59 IST)

Rose Day 2023 : हे गुलाबाच्या मखमली फुलांनो

rose
प्रेम व्यक्त करायचय, काहीतरी हवंय करायला,
हिंमत नाही होतं, जाऊन तिज सांगायला,
काहीतरी माध्यम हवं न , तिजवर पोहोचायला,
मला जे म्हणायचंय, ते न बोलता कळायला,
हे गुलाबाच्या मखमली फुलांनो,  माझे दूत व्हा,
मखमली स्पर्शात तुमच्या, तुम्हीच व्यक्त व्हा,
देईन मी तिच्या हातात, एक गुच्छ गुलाबाचा,
दिवस आहेतच फुलायचे, घेतो सहारा तुमचा!
...अश्विनी थत्ते