शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified रविवार, 22 जानेवारी 2023 (16:57 IST)

मराठी जोक- चला हसू या

joke
सर : गोट्या सांग पाऊस पडताना वीजा का चमकतात?
गोट्या : कारण देव बघतो की पाऊस कुठे कुठे पडला
 आणि कुठे पडायचा राहिलाय
सरांनी गोट्याला वर्गाबाहेर केले.

*******************
 
तीन मित्र बोलत असतात…
पहिला मित्र - माझ्या बायकोन गरोदरपणी 
जुडवा पिच्चर बघितला आणि
तिला जुळी पोरं झाली…
दूसरा मित्र - माझ्यापण बायकोन गरोदरपणी 
3 इडीयटचित्रपट बघितला आणि तिला 3 पोर झाली…
हे ऐकून तीसरा मित्र पळत सुटतो….
बाकीचे दोघे -अरे कुठे निघालास ..?
तिसरा मित्र - अरे देवा! माझी बायको आज 
अलीबाबा आणि चाळीस चोर चित्रपट बघत आहे. 
 
 
*******************************************************
दाताचे 500 लागतील  
 
राजू दाताच्या डॉक्टर कडे जातो 
 
राजू- डॉ.माझा दात दुखत आहे. 
दाताचा डॉक्टर -दात काढावा लागेल, किडला आहे. 
राजू- ठीक आहे, किती पैसे लागतील?
डॉ. -500 रुपये लागतील. 
राजू- हे घ्या 50 रुपये , दात सैल करून द्या , मी ओढून काढेन 
 
****************************************
विकलेला माल परत मिळणार नाही
 
मुलीचा अपघात झाला.
डॉक्टर - तुमचे पाय खराब झाले आहेत.
मुलगी - ते ठीक तर होईल न ?
डॉक्टर - नाही पाय कापावे लागतील.
मुलगी - अरे! देवा आता मी काय करू?
डॉक्टर ... धीर धरा. देव सर्वकाही ठीक करेल.
मुलगी - अहो, मला त्याची काळजी नाही. 
खरतर मी कालच नवीन चपला विकत घेतल्या आहेत 
आणि त्या दुकानावर लिहिले होते - 
"विकलेला माल परत मिळणार नाही". 


Edited by - Priya Dixit