1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (21:42 IST)

विरंगुळा -हसा आणि हसवा

1 गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात
 गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गणेश - खिळ्याला 
गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.
 
 
2 मास्तर :- अशी कोणती  बाई आहे, तीला १००%
 माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??
गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!
मास्तरांनी गण्याला वर्गाबाहेर केले. 
 
 3 शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या  बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे 
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 
 
4 गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?.
बंड्या : दुष्काळ
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..
 
 
5 गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी 
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!!!!!
 गुरुजी अजून वर्गात आले नाहीत.
 
6 पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
 
7 पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
 
खळखळुन हसा निरोगी रहा,
मित्रांनो आपणही हसा, आणि दुसऱ्यांनाही हसवा
          
 
HAPPY WORLD'S LAUGHTER (HAASYA) DAY