1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (19:33 IST)

Rose Day 2022: गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो जाणून घ्या

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने होते. व्हॅलेंटाईन डेच्या पहिल्या दिवशी, 7 फेब्रुवारी रोजी, रोझ डेच्या निमित्ताने, जोडपे त्यांच्या जोडीदारांना गुलाब देतात आणि त्यांच्या नात्यात आणि प्रेमात गुलाबाचा सुगंध आणि सौंदर्य आणतात. पण रोझ डे हा केवळ प्रेमी जोडप्यांचा च सण नाही. आपण मित्र आणि प्रियजनांना गुलाब देऊन गुलाब दिवस साजरा करू शकता. पण जर आपण जोडीदाराशिवाय इतर दुसऱ्याला गुलाब देत असाल तर गुलाबाचा रंग योग्य प्रकारे निवडा. गुलाबाची फुले अनेक रंगांची असतात. पण प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा वेगळा अर्थ असतो. चला तर गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घेऊ घ्या .
 
* लाल गुलाब-लाल रंगाचा गुलाब प्रेमाचा प्रतीक मानला जातो. जर आपण  कोणावर प्रेम करता तर आपण त्याला लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता.
 
* गुलाबी गुलाब-जर आपल्याला कोणी आवडत असेल तर आपण त्याला गुलाबी गुलाब  देऊ शकता. गुलाबी गुलाबाच्या रंगाचा आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे मैत्री. जर आपल्या एखाद्या मित्राने आपल्याला गुलाबी गुलाब दिला तर याचा अर्थ असा आहे की तो ही मैत्री महत्त्वाची मानतो आणि या मैत्रीसाठी आपले आभार मानत आहे .
 
* पिवळा गुलाब- जर कोणी आपल्याला पिवळा गुलाब दिला तर याचा अर्थ त्याला आपल्याशी मैत्री करायची आहे. पिवळे गुलाब मैत्री आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत.
 
* ऑरेंज गुलाब  - हे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. म्हणजेच आपल्याला  जर कोणी आवडत असेल तर त्याला केशरी गुलाब देऊन आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करू शकता.
 
* पांढरा गुलाब -पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तसेच पांढरा गुलाब हे तक्रारी मिटवून पुढे जाण्याचे प्रतीक आहे. जर आपल्याला कोणाची माफी मागायची असेल तर आपण त्याला रोज डे च्या दिवशी पांढरे गुलाब देऊ शकता.
 
* काळा गुलाब -काळा गुलाब हे शत्रुत्वाचे प्रतीक आहे. या रंगाचा गुलाब द्वेषाचे प्रतीक आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा सप्ताह आहे, त्यामुळे रोज डेला काळे गुलाब देण्याची ही योग्य वेळ नाही.