तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे
हॅपी व्हॅलेंटाईन डे
ज्याच्याजवळ माझ्या हृदयाची किल्ली आहे
ज्याचं प्रेम माझं मार्गदर्शक आहे
त्या माझ्या सर्वस्व असणाऱ्याला
व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
तुला माझ्या आठवणीत,
हसताना पाहायचंय
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय..
व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझे माझे नाते असे असावे
जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा
स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी
माझ्यातून मी कातरला
अन् सुटली सारी कोडी
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा
न सांगताच तू , मला उमगते सारे
कळतात तुलाही, मौनातील इशारे
दोघात कशाला मग, शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे
सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे
काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
ना कसले बंध, ना कसली वचने
मैत्री म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे