संबंधित माहिती
- Valentine's Day Special जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईतील सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे
- व्हॅलेंटाईन डेचा इतिहास आणि महत्त्व, १४ फेब्रुवारीलाच 'व्हॅलेंटाईन डे' का साजरा करतात?
- Valentine's Day 2026: पहिल्यांदा डेटवर जाताना काय करावे, काय करू नये जाणून घ्या
- Valentines Day 2026: व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो? जाणून घ्या मनोरंजक तथ्ये
- Valentine's Day Special Chocolate Dessert Recipe; घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवता येतील
Valentine's Day wishes for 2026 in Marathi व्हॅलेंटाईन डे २०२६ शुभेच्छा संदेश
तुझ्या प्रेमाचा रंग माझ्या आयुष्यात असाच कायम राहू दे,
हा व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रेमाला अधिक घट्ट करू दे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही,
तर एकमेकांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरणं असतं
माझ्या आयुष्यातील रंगाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
कधी अबोला तर कधी खूप साऱ्या गप्पा,
पण या सगळ्यात तुझं माझ्यावरचं प्रेम आहे सर्वात खास
व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ हवी आहे,
हे वर्ष आणि पुढची अनेक वर्षं मला फक्त तूच हवी आहेस
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या डोळ्यांत दिसणारं प्रेम हेच माझ्या जगण्याचं कारण आहे
तू सोबत असताना प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे वाटत आहे!
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
वेळ बदलतो, वर्ष बदलतात,
पण तुझ्यासाठी असणारं माझं प्रेम कधीच बदलणार नाही
व्हॅलेंटाईन डेच्या प्रेमळ शुभेच्छा!
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुझं हसणं
आणि त्याहून सुंदर म्हणजे तुझं माझ्या आयुष्यात असणं
Happy Valentine's Day!
शब्दांत सांगता येणार नाही इतकं प्रेम तुझ्यावर आहे,
तू फक्त माझ्या आयुष्यात राहा, बाकी काहीच नको आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
नशिबाने तुला माझं केलं आणि तुझ्या प्रेमाने मला पूर्ण केलं
हा खास दिवस तुझ्या नावाचा!
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम हे शब्दांत मांडण्यापेक्षा ते जगण्यात जास्त मजा असते,
आणि तुझ्यासोबत तर आयुष्य अगदी स्वप्नासारखं वाटतं
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपलं नातं हे विश्वासावर टिकलेलं असावं
आणि प्रेमाने बहरलेलं असावं
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला
एक नवी दिशा मिळाली,
तू फक्त माझी मैत्रीण/मित्र नाहीस
तर माझं सर्वस्व आहेस
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष २०२६ आहे पण आपल्या प्रेमाची जादू
आजही पहिल्या दिवसासारखीच ताजी आहे.
माझ्या लाडक्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
गुलाबाचं फूल तर कोमेजून जाईल,
पण तुझ्याबद्दलची माझी ओढ कधीच कमी होणार नाही
तू माझी कायमस्वरूपी 'व्हॅलेंटाईन' आहेस
हात तुझा हातात असावा आणि आयुष्यभराचा प्रवास असावा,
यापेक्षा दुसरं कोणतंही सुख नको
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
आजचा दिवस आहे खास,
जन्मभर मिळो मला तुझा सहवास
आजचा दिवस आनंदाने भरलेला जावो
आणि आयुष्यही तुझ्या सान्निध्यात
Happy Valentine's Day!"
तुझ्या हसण्यानेच सुरू होतो माझा दिवस,
आणि तुझ्या आठवणीतच मावळतो माझा सूर्य...
हे आयुष्य तुझ्या नावावर करायचंय
Happy Valentine's Day!"
हात हातात घेऊन तुझं,
आयुष्यभर चालायचं आहे...
तुझ्या डोळ्यांत पाहून मला,
माझं जग पाहायचं आहे!
Happy Valentine's Day!
