गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (06:28 IST)

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा Valentine Day 2024 Wishes

valentines day
तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे 
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे
Happy Valentines Day
 
असंच कधी तुला
माझ्या आठवणींत
हसताना पाहायचंय
जीवनाचं सुंदर स्वप्न मला
आता तुझ्याचसोबत जगायचंय
Happy Valentines Day
 
बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
Happy Valentines Day 
 
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
Happy Valentines Day 
 
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy Valentines Day
 
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
Happy Valentines Day
 
आता राहवेन मुळीच
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे
दे सोबती हात मला
Happy Valentines Day
 
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण
Happy Valentines Day
 
मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला
Happy Valentines Day
 
ना कसले बंध, ना कसली वचने
प्रेम म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे
Happy Valentines Day
 
भाषा प्रेमाची मला कळते आहे
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे
आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे
Happy Valentines Day