कुडाळमधून निवडणूक लढवणार नारायण राणे
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. नारायण राणे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. तसेच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचेही राणेंनी म्हटले आहे. काँग्रेस आपली पहिली यादी 17 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.
दरम्यान, आघाडीतील जागावाटपाचा गणित अधिक गुंतागुंतीचे होत आहे. त्यात कॉंग्रेस पहिली यादी जाहीर करणार आहे. त्यात कोणाला स्थान मिळते, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.
दोनच दिवसांपूर्वी निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.

