राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत!
संपूर्ण महाराष्ट्रच माझा मतदार संघ असे सांगणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांनी नागपूरात संबोधित करताना सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटूंबातील कुणीही निवडणूक लढवली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हाच आम्ही मतदार संघ मानला. त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक लढवली तर दुसर्या मतदार संघाने काय पाप केले आहे. असा स्वत: भावनिक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत न उतरण्याचे स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूरात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले विदर्भात सर्वच जागांची मागणी होती. परंतु किमान 40 ते 45 जागा लढविल्या जातील असेलही राज म्हणाले. यंदा मात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर येथील कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय योग्य आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या जागी दुसरे कुणीही असते तर त्यांनी हाच निर्णय घेतला असता, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

