चित्रपट सृष्टीतही तेंडुलकरांचा अमीट ठसा आहे. त्यांनी लिहिलेले मराठी सिनेमे अजरामर ठरले आहेत. सिंहासन ही वास्तविक अरूण साधूंची कादंबरी. पण त्यावर चित्रपट करायची वेळ आली तेव्हा त्याची पटकथा तेंडुलकरांनी लिहिली. मराठीतील माइलस्टोन मानल्या गेलेल्या चित्रपटांच्या कथा तेंडुलकरांनी लिहिल्या. हिंदीतही अर्धसत्य, मंथन, सरदार, निशांत या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या.
शांतता कोर्ट चालू आहे १९७२ निशांत १९७५ सामना १९७५ मंथन १९७६ सिंहासन १९७९ आक्रोश १९८० आक्रीत १९८१ उंबरठा १९८१ अर्धसत्य १९८३ कमला १९८४ सरदार १९९३