1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. विंदा करंदीकर
Written By
Last Updated : गुरूवार, 14 मार्च 2024 (14:50 IST)

गोविंद विनायक करंदीकर('विंदा करंदीकर') जीवनपरिचय

vinda karndikar
विंदा करंदीकर यांचा जन्म २३ ऑगस्ट १९९८ मध्ये धालवली सिंधुदुर्ग मध्ये झाला. विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर हे आहे. विंदा करंदीकर यांचे वडील विनायक करंदीकर कोकणातील पोंभुर्ला येथे असायचे. कोल्हापूर येथे विंदा करंदीकर यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला व त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तसेच ते कोकणमधील आर्थिक मागासलेपणाबद्दल संवेदनशील होते. त्यांचा वैचारिक प्रवास राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा राहिला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. इंग्रजी विषयाचे बसवेश्वर कॉलेज, रत्‍नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होते. फक्त लेखन करण्यासाठी इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते स्वावलंबी होते. तसेच त्यांची काटेकोरपणाबद्दल भूमिका नेहमी आग्रही राहिली. व स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतन पण त्यांनी कधी स्वीकारले नाही. विंदा करंदीकर यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत. व विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या.
       
विंदा करंदीकर हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. तसेच देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला आहे. विंदा करंदीकर हे वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. तसेच विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहे. विंदा करंदीकर यांना  इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती.  तसेच या रकमेच्या येणाऱ्या व्याजातुन दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सांगितले  होते. विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, तसेच मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ देखील रोवली.एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय विंदा करंदीकरांच्या कवितेत येतो. त्यांची कविता कधी कधी कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना भासते.तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. अश्या या महान साहित्यिकाचे निधन १४मार्च २०१० मुंबई मध्ये झाले. मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक असलेले गोविंद विनायक करंदीकर('विंदा करंदीकर') हे अनंतात विलीन झाले.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik