दिन विशेष : विंदा करंदीकर
WD
इंग्रजीचे प्राध्यापक असणार्या विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले. पण विंदा आठवतात ते वसंत बापट आणि पाडगावकरांसह त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणार्या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन
‘देणार्याने देत जावे’ चा अनुभव रसिकांना दिला. विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहितात तसे ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही लिहितात.
