मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By
Last Updated : शनिवार, 28 मे 2022 (09:26 IST)

वीर सावरकर स्मृतिदिन विशेष:वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी

स्वातंत्र्य वीर सावरकर त्यांच्या बद्दल 10 गोष्टी जाणून घेऊ या.
 
* विनायक दामोदर सावरकर दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2-2 जन्मठेपेची शिक्षा झाली असून ती त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाले.
 
* विश्वातील पहिले असे लेखक ज्यांची 1857 के प्रथम स्वतंत्रता संग्राम रचनेला 2-2 देशांनी प्रकाशनापूर्व बंदी घातली होती.
 
* ते प्रथम असे स्नातक होते ज्यांची पदवी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने हिसकावून घेतली होती.
* वीर सावरकर प्रथम असे भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी इंग्लंडच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता. परिणामस्वरूप त्यांना वकालत करता आली नाही.
 
* वीर सावरकर प्रथम असे भारतीय राजकारणी होते ज्यांनी सर्वप्रथम विदेशी वस्त्रांची होळी जाळली होती.
 
* वीर सावरकर यांनी राष्ट्रध्वज तिरंगाच्या मधोमध धर्म चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला.
 
* पूर्ण स्वातंत्र्याला भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे लक्ष्य घोषित करणारे प्रथम व्यक्ती सावरकर होते. ते प्रथम असे राजकारणी बंदिवान होते ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले.
 
* ते पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्ध आंदोलन सुरु केले.
 
* दुनियेतील पहिले असे कवी ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळ आणि कोळशाने कविता लिहिल्या आणि त्या पाठ केल्या. या प्रकारे पाठ केलेल्या 10 हजार ओळी त्यांनी जेलहून सुटल्यावर पुन्हा लिहिल्या.
 
* सावरकर लिखित पुस्तक 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस-1857 एक सनसनाटी पुस्तक ठरली. ब्रिटिश शासनात या पुस्तकामुळे गोंगाट पसरला होता.