गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By

पाचनसंस्था सुरळीत राहण्यासाठी जेवण केल्यानंतर हे व्यायाम करा

gomukhsan
जेवण केल्यानंतर चालणे हे फायदेशीर असते. जेवण केल्यानंतर हळूहळू धावणे(जॉगिंग)चांगले असते. तसेच गोमुखासन तुमच्या पाचनसंस्थेसाठी मदतगार असते. 
Exercise After Eating : जेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा आपले शरीर जेवण पचवण्यासाठी ऊर्जा निर्माण करीत असते. या प्रक्रियेमध्ये आपले पोट जास्त केलेल्या जेवणातून पोषकतत्व वेगळे करते आणि त्यांना शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवते. या प्रक्रियेत आपले शरीर ऊर्जा निर्माण करते. ज्यामुळे आपल्या शारीरिक क्रिया सुरळीत चालण्याकरिता उत्तेजित होतात. 
 
अनेक वेळेस आपण जेवण केल्यानंतर लगेच बसून जातो. आणि जास्त वेळ हा खोलितच घालवतो. अश्यामुळे शरीरात ऊर्जा तर निर्माण होते पण ही ऊर्जा खर्च होत नाही. ज्यामुळे शरीरात चरबी जमा होण्याचा धोका वाढतो. म्हणून जेवण केल्यानंतर व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम केल्याने आपली शारीरिक क्रिया ही सक्रिय  राहते. आणि जेवणाचे पाचन होण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्मित होते. यामुळे आपले शारीरिक आरोग्य हे चांगले तर राहते सोबतच मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. चला तर असे व्यायाम जाणून घेऊ या जे जेवण केल्यानंतर पण आपण करू शकतो. जे आपले शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. 
 
1. चालणे(वॉकिंग)- जेवण झाल्यानंतर चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. चालण्याने आपली पाचन संस्था सुरळीत राहते. जेवण झाल्यानंतर थोडावेळ फिरल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढते व ज्यामुळे जेवण लवकर पचते. 
 
2. हळूहळू धावणे(जॉगिंग)- जेवण झाल्यानंतर जॉगिंग करणे फायदेशीर असते. हे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात आणि पाचनक्रिया सुरळीत करते. जॉगिंग केल्यामुळे आपला श्वासोच्छ्वास वाढतो ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते. 
 
3. सुखासन-  तुम्ही सुखासन मध्ये बसून जेवण पचवू शकतात. जेवण केल्यानंतर 5-10 मिनिट सुखासन मध्ये बसा. त्यानंतर थोडावेळाने चालावे. यामुळे शरीरात उर्जेचा स्तर वाढेल. आणि पोटा संबंधित समस्या दूर होतील. 
 
4. गोमुखासन- गोमुखासन पाचन क्रिया चांगली ठेवण्याकरिता  मदतगार असते. आणि जेवण केल्यानंतर तुमच्या पोटाला आराम देते. हे तुमची कंबर आणि पोटातील मांसपेशिला लवचिक करायला मदत करते. ज्यामुळे पाचनक्रिया सुरळीत होते. 
 
5. ताणणे(स्ट्रेचिंग)- जेवण केल्यानंतर स्ट्रेचिंग हा व्यायाम देखील करू शकतात. हा व्यायाम आपल्या शरीराची लवचिकता वाढवतो. तसेच आपण केलेले जेवण पचवण्यासाठी मदत करतो. 
 
हे व्यायाम जर जेवण झाल्यानंतर केलेत तर शरीरातील पाचनसंस्था सुरळीत राहते व वजन देखील वाढत नाही. तसेच आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर व्यायाम करणे गरजेचे असते.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik