Festival Posters
✕

yoga for flexible body लवचिक शरीरासाठी करा योग

Updated: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (22:25 IST)
 
लवचिक शरीरात उर्जा कायम राहते. श्वास घेणे आणि सोडण्यात कोणतीही अडचण येत नाही. व्यक्तीमध्ये स्फूर्ती, जोश कायम रहातो. शरीरातील नको असलेली उर्जा बाहेर पडते. नेहमी ताजेतवाने वाटते.
 
* आहार : सर्वप्रथम आपला आहार बदला. पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करा. ताज्या फळांचा रस, ताक, कैरीचे पाणी, जलजीरा यासारख्या पेयांचे नेहमी सेवन करा. काकडी, टरबूज, डांगर, संत्रे, पुदिना यांचे भरपूर सेवन करा. मसालेदार आणि तेलयुक्त पदार्थांचा वापर टाळा.
 
* योगासन : रोज नियमित सूर्यनमस्कार करा. कपालभारती आणि भस्त्रिका यांच्याबरोबर अनुलोम-विलोम करा. उभे राहून करण्यात येणार्‍या योगासनामध्ये त्रिकोणासन, कटीचक्रासन, ताडासन, अर्धचंद्रासन करा. तसेच उष्ट्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, सिंहासन, समकोनासन, ब्रम्ह मुद्रा आणि भारद्वाजासनासारखे बसून करता येणारी आसनेही करा. भुजंगासन, धनुरासन आणि हलासन करणेही चांगले.
 
* निवड : योगासनाची सुरवात कुठूनही करता येईल. पण सुरवातीला सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करा. त्यानंतर वरती दिलेल्या आसनांपैकी कमीत कमी तीन आसने नियमित करा. केवळ दोन महिन्यात तुम्हाला परिणाम दिसतील.
 
* फायदा : योगासनामुळे तुमचे शरीर लवचिक राहीलच पण तुम्ही स्वस्थ आणि उर्जावान राहाल. म्हतारपण तुमच्यापासून खूप लांब राहील. पचनसंस्था चांगली राहणार असल्याने रोगापासून तुम्ही लांब राहाल. हात आणि पायात वेदना होणार नाही. शरीरातील चरबी कमी होऊन शरीर हलके-फुलके राहील.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

पुढील लेख
Show comments