शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By

योगा करा, धूम्रपान सोडा

धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सर्वाना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. एका अध्ययनातून असे सांगितले जाते की, धूम्रपान सोडायचं असेल तर प्राणायम योगा सर्वात जास्त उपयोगी पडेल. 
 
योगाचे अभ्यासक दीपक झा यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय. योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा लांब ठेवू शकतो. 
 
धूम्रपान सोडण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उपाय उपलब्ध आहेत. पण, धूम्रपान रोखण्यासाठी याचा वापर एवढा प्रभावशाली नाही. सिगारेटमधून निघणार्‍या धुरामुळे शरीराला धोका असणारे पदार्थ शरीरात प्रवेश करून रक्त गोठायला सुरुवात होते. 
 
त्यामुळे याचा परिणाम हृदय आणि रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन रक्तातील अभिसरण कमी करतं. 
 
धूम्रपानच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. धूम्रपानामुळे श्वसनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थाना लांब ठेवले जाते, असे झा यांनी म्हटलंय. त्याचबरोबर तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवून आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो. सर्वागासन (शोल्डर स्टँड), सेतू बंधासन (ब्रिझ मुद्रा), भुजंगासन (कॉबरा पोझ), शिशुआसन (बाल पॉझ) या सर्व योगासनांमुळे स्मोकिंगपासून सुटका होण्यास मदत होते.