1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (16:00 IST)

मानेच्या कडकपणापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Follow these tips to get instant relief from neck stiffness मानेच्या कडकपणापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा Marathi Yogasan Marathi Yoga Lifestyle Marathi
तुम्हीही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना बराच वेळ बसून राहत असाल तर तुम्हाला मान अखडण्याची  समस्या होऊ शकते. यामध्ये कोणते योगासन झटपट आराम देईल, चला जाणून घ्या. 
 
* स्ट्रेचिंगपासून आराम मिळेल
 पाठ सरळ ठेवून सुखासनात  बसा. आता तुमची हनुवटी छातीकडे खाली करा. 15-30 सेकंद या स्थितीत रहा, नंतर हळूहळू आपले डोके वर करा. आता वर पाहताना, डोके तुमच्या पाठीकडे आणा आणि 10 सेकंद तसेच ठेवा. मग त्या स्थितीत परत या. ही प्रक्रिया सहा ते सात वेळा करा. लक्षात ठेवा की  हे आसन हळुवार आणि आरामात करायचे आहे , मानेला धक्का लागू नये . त्याचप्रमाणे, हळू हळू आपले डोके उजव्या खांद्याकडे टेकवा. जेव्हा तुम्हाला ताण जाणवतो तेव्हा थांबा. पाच ते दहा सेकंद या स्थितीत रहा. नंतर जुन्या स्थितीत  परत या. आपल्या डाव्या बाजूला समान प्रक्रिया पुन्हा करा.
 
डोके डावीकडे व उजवीकडे वळवणे -  हे कामाच्या दरम्यान काही सेकंदांसाठी बाजूच्या बाजूने म्हणजे उजवीकडे डावीकडे पाहण्याचा एक चांगला उपाय  आहे. खुर्चीवर बसून ते दररोज करता येते. पण हा व्यायाम करताना मान सरळ ठेवा, नंतर ती उजवीकडे वळवा आणि 10 सेकंद कोणत्याही एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. नंतर डाव्या बाजूला वळवा . असं केल्याने आराम मिळेल. तुम्ही हे दर तासाला करू शकता. तसेच, मधेच कामातून ब्रेक घेत राहा.
 
हीटिंग पॅड ने शेका -
मानेचे दुखणे किंवा कडकपणा कमी करण्यासाठी हीटिंग पॅडसह शेक करणे देखील एक चांगला मार्ग आहे. 10-15 मिनिटांसाठी वेदनादायक भागावर एक हीटिंग पॅड ठेवा. तसेच वेळोवेळी बसण्याची स्थिती बदलत राहा. वेदना तीव्र असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.