Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डेंग्यूपासून बरे होण्यासाठी सोपी योगासने

Updated: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (13:14 IST)
 
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राणायाम आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. तणाव दूर करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. भ्रामरी प्राणायाम रक्तदाब कमी करते. याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येण्यास मदत देखील होते. याशिवाय कपालभाती आणि अनुलोम-विलोम सारख्या पद्धती नसा आणि पाचक अवयव निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची कार्ये सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे व्यायाम जलद पुनर्प्राप्ती मिळविण्यात मदत करू शकतात.
 
वज्रासन योग मन शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करतं तसेच पचन व्यवस्थित ठेवण्यास आणि शरीराला आराम देण्यास देखील उपयुक्त आहे. गुडघेदुखी पासून मुक्ती, मांडीचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि पाठदुखी कमी करण्यासाठी याचे फायदे आहेत. डेंग्यूपासून बरे होण्यासाठी या योगासनातून विशेष फायदे मिळू शकतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते.
 
पश्चिमोत्तनासन योगाचा सराव करण्याची सवय उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना बरेच फायदे देते. शरीर आणि मन शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी त्याचे फायदे देखील दिसून आले आहेत. हे डोक्यात रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं. यामुळे मेंदूला आराम मिळतो. निद्रानाश, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या कमी होतात. डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी या योगाच्या सरावाने फायदे मिळू शकतात.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Cabbage Peas Stir Fry स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकी भाजी ''कोबी मटार''

शरीरातील साखर अचानक कमी झाल्यास काय होते? ही लक्षणे ओळखा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या उपाययोजना

होम सायन्समध्ये करा उज्ज्वल करिअर; जाणून घ्या व्याप्ती आणि पगार

केस गळतीवर भोपळ्याच्या बियांचा आयुर्वेदिक उपाय, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

फेस पॅक लावूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही? या ४ चुका टाळा, त्वचा दिसेल अधिक चमकदार!

पुढील लेख
Show comments