बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2022 (20:14 IST)

Women's Day 2022: या योगासनांमुळे मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळेल, नैसर्गिक चमक येण्यासाठी दररोज सराव करा

Women's Day 2022: Get Rid Of Acne Problems With These Yogasanas
चेहऱ्यावर दिसणारे पुरळ व्यक्तीचे सौंदर्य तर बिघडवतातच पण हे पुरळ आत्मविश्वासही कमी करतात. उन्हाळ्यात मुरुमांचा त्रास माणसाला जास्त होतो. अशा स्थितीत मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या क्रीम्सचा वापर करतात. त्यामुळे अनेक वेळा फायद्यापेक्षा तोटाच जास्त दिसून येतो. मुरुमांमुळे  चेहऱ्याची चमकही या त्या मागे लपते,  मुरुमांपासून मुक्त त्वचा मिळविण्यासाठी काही योगासने आहेत, या योगासनांचा नित्यक्रमात समावेश करा मुरुमांपासून मुक्त त्वचा मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1 प्राणायाम- प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण ठेवता येते. असे केल्याने तणाव दूर होतो, शरीराची उर्जा वाढते आणि शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन पोहोचते, ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि शरीरात रक्ताभिसरणही चांगले होते. यामुळे त्वचेवरील मुरुम किंवा सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा चमकदार होते. 
 
2 कपालभाती प्राणायाम-कपालभाती पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे  केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. कपालभातीमुळे पचनक्रिया सुधारून रक्ताभिसरणही सुधारते. असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात. कपालभातीच्या रोजच्या सरावाने त्वचा मुरुम मुक्त आणि सुंदर बनते.
 
3 उत्तानासन-उत्तानासन शरीर स्ट्रेच करून लिव्हर आणि किडनी निरोगी ठेवते. अनेक वेळा जास्त ताण घेतल्याने चेहऱ्यावर मुरुमेही येतात, अशा परिस्थितीत उत्तान तणाव कमी करून हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुमांपासून सुटका होते. 
 
4 बालासन- नेहमी तणावाखाली असणाऱ्यांना मुरुमांची समस्या अधिक होऊ शकते. अशा परिस्थितीत बालासन करणे फायदेशीर ठरू शकते. बालासन तणाव आणि चिंता दूर करून हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.