शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

योगासन: अश्विनी मुद्रा

-विनायक देसाई

PR
PR
अश्व म्हणजे घोडा. घोडा लीद टाकताना ज्याप्रमाणे गुदद्वार आत- बाहेर करतो, त्या प्रमाणे गुदद्वाराचे आकुंचन करावे व सैल सोडावे. असे आकुचंन- प्रसरण लागोपाठ दहा- बारा वेळा करावे. ही क्रिया दिवसभरात केव्हाही व कोठेही बसून वा उभे राहून करता येते.

WD
लाभ: दिवसभरात चार- पाच वेळा हि क्रिया केल्यास गुदद्वार व मूत्रेंद्रियांच्या स्नायूची कार्यक्षमता वाढते. बहुमूत्रता, गुदभ्रंश, योनीभ्रंश, पक्षवात, कंपवात या विकारांवर उपयुक्त. शरीरातील चपळपणा व उत्साह वाढतो. हे आसन धावपटू व खेळाडूंना फार फायदेशीर आहे.