योगासन: उड्डियान
- विनायक देसाई
उडि्डयान करण्यासाठी सुरूवातील पद्मासन व सुखासनामध्ये बसावे. हातांचे तळवे दोन्ही गुडघ्यांवर असे ठेवावे की कोपरे बाहेर येतील व शरीराचे वजन तळहातांवर येईल. गुदद्वार वर ओढून बंद करावे. श्वास संपूर्णसोडून पोट शक्य तितके आत ओढावे. हनुवटी छातीला लावावी. या अवस्थेमध्ये विनाश्वास शक्य तितके थांबावे. श्वास घ्यावा असे वाटल्यास प्रथम पोट सैल सोडावे. मान वर करून सावकाश श्वास भरावा. चार-पाच स्वाभाविक श्वासप्रश्वासांनंतर दुसरे आवर्तन करावे. एकदंर ती आवर्तने करावीत. लाभ: तडागीप्रमाणे सर्व लाभ मिळतात. रक्तशुध्दीचा वेग वाढतो. हृदयाचा व्यायाम घडविला जातो. वृध्दावस्थेत तारूण्याचा लाभ होतो. प्रोस्ट्रेट ग्रंथी वाढण्याची समस्या दूर होतो. चपळता व उत्साह वाढतो.