1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

वायुसार

PR
PR
पद्मासन व सुखासनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. ओठांचा चंबू करून तोंडावाटे हवा ओढून घ्यावी. ओठ मिटून पाण्याच्या घोटाप्रमाणे हवा गिळावी व दोन्ही नासिकांनी सावकाश श्वास सोडावा. ढेकर येईपर्यत अथवा 10 ते 12 वेळा अशीच क्रिया करावी.

WD
लाभ: शरीरात वाढलेला वात ढेकरांद्वारे बाहेर पडतो. स्नायू आखडणे, हात, पाय व पाठीत वायूचा गोळा येणे यावर उपयुक्त आहे. श्वासपलटाची व शरीरात वात नियंत्रित करणार्‍या यंत्रणांची कार्यक्षमता वाढते. वातामुळे छातीत, पोटात दुखत असल्यास उपयुक्त.