Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्यफल (04 ते 10 जुलै 2021)

Updated: शनिवार, 3 जुलै 2021 (22:56 IST)
 
कर्क : महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. शुभदिनांक १८, १९.
 
सिंह : नव्या उमेदीने कामाला लागाल. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जुने मित्र भेटतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.
 
कन्या : व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जुने मित्र भेटतील. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा.
 
तुळ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आगंतुक पाहुणे येण्याची शक्यता राहते. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल.
 
वृश्चिक : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना भावंडांशी सल्लामसलत कराल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील.
 
धनु : प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. जूनी येणी वसूल होतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल.
 
मकर : आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. समाधान लाभेल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी लाभतील.
 
कुंभ : उत्तरार्धात कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने नवीन प्रकल्प राबविण्यात यश येईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका.
 
मीन : नवीन व्यावसायिक करार घडतील.प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. नवनवीन कल्पना आकार घेतील. आपल्या राशीतून गुरु, शुक्राचे तर दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल.
 

सर्व पहा

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

नागपंचमी २०२६ जवळ आली! महाराष्ट्रात पूजेसाठी कोणते साहित्य लागते? जाणून घ्या संपूर्ण यादी

श्रावणात महादेवाला 'हे' एक पान वाहिल्यास दूर होतील सर्व अडचणी; जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारी उपवासाला काय खावे आणि काय टाळावे? पाहा पूर्ण डाएट लिस्ट

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख