Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहित राशीफल 16 ते 22 जुलै 2023

Updated: शनिवार, 15 जुलै 2023 (14:48 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. मनातील कार्ययोजना प्रत्यक्ष कृतीत येतील. यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही प्रमाणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अन्यथा नुकसानकारक योग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. त्यामुळे मनावरील काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या घडामोडी व घटना घडतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेंसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. उधारी वसुलीचे संकेत व सूचना मिळतील. आर्थिक समस्या मिटेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळेल. शांतता टिकून ठेवण्याचा प्रय▪जारी ठेवणे चांगले.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळून उत्साहवाढीस लागू शकेल. अंतिम चरणात जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. हातात पैसा खेळताच राहू शकेल. आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहून काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने विशेष फायदेशीर ठरतील. नवीन कराराचे प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढतील. जवळचा प्रवास घडेल; परंतु तो दगदग व त्रास वाढविणारा ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल. होणारा त्रास कमी होईल. अंतिम चरणात धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करावा लागेल. अपूर्ण व्यवहार कामांना गती मिळेल व यशस्वीतेच्या मार्गावर राहतील. मानसिक शांतता टिकून राहून उत्साहवर्धक स्थिती कायम राहील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून फायदा घडेल. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. काही बाबतीत दगदग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट वाढण्याची शक्यता आहे. अंतिम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना घाईघाईने निर्णय घेणे अहितकारक ठरेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व यशस्वीतेचा मार्ग खुलाच राहू शकेल. यश समोर दिसू लागेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. अंतिम चरणात नियोजित कार्यक्रम रूपरेषेप्रमाणे होईल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा, लाभप्रदच ठरू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल व संततीबाबद आनंदवार्ता हाती येईल. आर्थिक समस्या व प्रश्न मनोनुकूलरीत्या मिटण्याच्या मार्गावर येतील. यश दृष्टिक्षेपातच राहील. अंतिम चरणात विरोधक मंडळीच्या कारवाया तूर्त थांबतील व विरोधक मंडळी सहकार्य करू लागतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सर्वत्र अपेक्षेइतके यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे.

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments