Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weekly Horoscope : 7 ते 13 मे 2023 साप्ताहिक राशीफल

Updated: शनिवार, 6 मे 2023 (15:17 IST)
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे विश्वासपात्र अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या गैर हजेरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.  या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारीचे लगेचच आरोग्य चाचणी करून त्याचे समाधान करावे. 
 
सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फार जास्त गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक बाबतीत समजुतदारी आणि समाधानाचे धोरण ठेवावे लागणार आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे लागणार आहे अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
 
कन्या : आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक प्रकरणात काळजी राहील. आरोग्याच्या बाबतीत संबंधी संपूर्ण आठवडा उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृत करण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे.
 
तूळ : या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरणात तणाव, शारीरिक तंदुरस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होईल. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. 
 
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ मिळेल आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. तुमच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा आठवडा आहे. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास यशस्वी ठराल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवाल. 
 
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंद अनुभवाल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळेल किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघतील. 
 
मकर : हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढ उतार लक्षात येईल त्याची काळजी घ्या. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र कार्य करणार्‍या लोकांना लहान सहानं कार्य मिळत राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य अतिउत्तम राहणार आहे. 
 
कुंभ : या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे अथवा मनोरंजनावर जास्त वेळ घालवायला मिळणार आहे. लग्न समारंभ किंवा सामाजिक प्रसंगांमध्ये जाण्याचा योग तयार होत आहे. मित्र किंवा परिचितांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रवासादरम्यान लहान सहानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
 
मीन : तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. 

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments