Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024

Updated: शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (21:39 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा जुनेच आजार पुन्हा त्रासदायक स्वरूपाने समोर येण्याची दाट शक्यता आहे. विरोधक मंडळींच्या कारवायांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल व होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात भागीदारी क्षेत्र समस्या व अडचणी निर्माण करणारे राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार काळजीपूर्वकच करावा.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Krishna Baby Girl Names मुलीचं नाव ठेवताना अर्थही सुंदर हवा? श्रीकृष्णाशी संबंधित ही नावे पाहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य पाककृती: कृष्ण जन्माचा पारंपरिक प्रसाद

मोदकाचा आकार असाच का असतो? बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यामागे आहे खास अर्थ

श्री कृष्ण जन्माष्टमीपूर्वी या शुभ वस्तू घरी आणा! लाडू गोपाळाचा आशीर्वाद मिळवा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments