Dharma Sangrah
✕

साप्ताहिक राशीफल 25 मे 2025 ते 01 जून 2025

Updated: रविवार, 25 मे 2025 (17:20 IST)
 
कर्क : प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले आवडते छंद पासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल.जोडीदाराची पदोन्नती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग येतील.  
 
सिंह : पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वाहन-वास्तूचे योग येतील. प्रतिष्ठीत व्यक्तीचे घराला पाय लागतील.  
 
कन्या : कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात षष्ठस्थ मंगळामुळे उष्णतेच्य विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.  
 
तूळ : बौद्धीक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठय़ा यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. अडचणी कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून आत्मउन्नती करता येईल. पराक्रमातील मंगळामुळे अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल.  
 
वृश्चिक : जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. उत्तरार्दात जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  
 
धनु : प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपण आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. मनस्वास्थ लाभेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावरता येईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. अनावश्यक खर्च उद्भवतील.  
 
मकर : वरिष्ठांच्या  सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.  
 
कुंभ : व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.  
 
मीन : आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिक कामात यश मिळे. नोकरीत वरीष्ठांचा पाठिंबा मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश संपादन कराल. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम विनासायास मार्गी लागतील. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक यांना चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल.  
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख