Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'हो, मी ऑटोसेक्शुअल आहे आणि मी स्वतःलाच डेट करते'

Updated: बुधवार, 12 जून 2019 (14:10 IST)
 
ऑटोसेक्शुअलिटी म्हणजे काय?
जे लोक स्वतःच्या शरीराला पाहूनच स्वतःला लैंगिक सुख देऊ शकतात आणि स्वतःच्या शरीराकडे आकर्षित होतात त्याला ऑटोसेक्शुअल अशी शास्त्रीय संज्ञा आहे. हे लोक गे किंवा लेस्बियन नसतात, तर याला ऑटोसेक्शुअल म्हटलं जातं. या लोकांना कोणत्याही लिंगाच्या इतर व्यक्तीप्रती लैंगिक आकर्षण नसतं.
 
ऑटोसेक्शुअल या संज्ञेसाठी शब्द तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना भरपूर मेहनत करावी लागली. हा शब्द परिभाषेत आणण्यासाठी पुरेशी माहिती किंवा संशोधन उपलब्ध नव्हतं. परंतु 1989 मध्ये लैंगिकविषयांचे तज्ज्ञ बर्नार्ड अपलबाऊम यांनी या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख केला. जे लोक इतर कोणत्याही व्यक्तींकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्यासाठी हा शब्द बर्नार्ड यांनी वापरला होता. मात्र आता जे लोक स्वतःच्या शरीराकडेच आकर्षित होतात त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो.
 
स्वतःबरोबर डेटिंग आणि स्वतःबरोबरच रोमान्स
मायकल आरोन यांनी'मॉडर्न सेक्शुअलिटीः द ट्रुथ अबाऊट अँड रिलेशनशिप' हे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात, स्वतःच्या शरीराकडे पाहून आकर्षित होणं सामान्य बाब आहे. परंतु काही लोक इतरांच्या तुलनेत स्वतःला पाहून, स्वतःला स्पर्श करून अधिक उत्तेजित होतात. अशा लोकांना ऑटोसेक्शुअल म्हटलं जातं.
 
अनेक लोकांनी मला नार्सिस्ट म्हटलं. जी व्यक्ती स्वतःवर भरपूर प्रेम करते आणि स्वतःवरच मुग्ध होऊन जाते तिला नार्सिस्ट म्हटलं जातं.
 
नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसॉर्डर या आजाराचं रूग्णांमध्ये सहानुभूती कमी मिळणं, कौतुकाची गरज वाटणं अशा भावनांची लक्षणं दिसतात, असं लंडन विद्यापीठात शिकवणारे डॉ. जेनिफर मॅकगोवन सांगतात. परंतु ऑटोसेक्शुअल यांच्यापेक्षा वेगळे असतात असं ते म्हणतात.
 
ऑटोसेक्शुल लोक एकटेच लैंगिक सुख मिळवतात. पण नार्सिस्ट लोकांना दुसऱ्या लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असतं. मात्र ऑटोसेक्शुअल लोकांना इतरांच्या प्रशंसेशी काही देणं-घेणं नसतं. असं डॉ. जेनिफर सांगतात.
 
काही तज्ज्ञ सांगतात, इतर लोकांप्रमाणे ऑटोसेक्शुअल लोकांमध्येही लैंगिकतेचे वेगवेगळे स्तर दिसून येतात. काही लोक ऑटोसेक्शुअलिटीबरोबर ऑटोरोमॅंटिकही असतात. ते स्वतःलाच डेट करतात किंवा चांगल्या मौसमात एकटेच फिरायलाही जातात.
 
ऑटोसेक्शुअलटीबरोबर मला कधीकधी आपण सामान्य व्यक्तींप्रमाणे असावं असं वाटत. मला काय वाटतं हे माझे मित्र समजू शकत नाहीत, त्यामुळे मला राग येतो. बॉयफ्रेंडबरोबर मी असते तेव्हा मला थोडं वेगळं वाटत असतं. पण लैंगिकदृष्ट्या माझा बॉयफ्रेंड समजू शकतो ते मला समजत नाही. त्यामुळे आपणही सामान्य लोकांप्रमाणे असावं मला वाटतं. पण माझी लैंगिकता वेगळी आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वजण वेगवेगळे आहोत असा विचार मी करते.
 
नुकतीच एका ऑटोसेक्शुअल महिलेशी माझी ऑनलाइन भेट झाली आहे. तिला मी ऑटोसेक्शुअल असल्याचं सांगितलं आहे. तिच्याशी बोलून मला बरं वाटलं. लैंगिकतेच्या आराखड्यात आपण कोठे उभं आहोत हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बहुतांश लोकांना हे समजणार नाही.
 
आमच्याबद्दल मत बनवणं, बोलणं सोपं आहे पण ऑटोसेक्शुअल व्यक्तीला कसं वाटतं हे तुम्हाला कधीच समजणार नाही. मी अनेक जणांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते पण स्वतःबरोबर जे वाटतं ते इतर कोणाबरोबरही वाटलं नाही.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख