बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काय आहे कलम 377 आणि अनैसर्गिक संभोग म्हणजे नेमके काय ?

भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम 377 प्रमाणे जी व्यक्ती पुरुष, महिला किंवा प्राण्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवेल ते गुन्हाच्या श्रेणीत असून त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल. तुरुंगवासाची ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकेल, तसंच दंडालाही पात्र ठरेल. 
 
हा कायदा 150 वर्षांपासून अस्तित्वात आहे. लॉर्ड मॅकॉडले यांनी भारतीय दंड संहिता १८६० साली तयार केली. या संहितेवर ब्रिटिशकालीन छाप होती. यानुसार अनैसर्गिक संभोग हा गुन्हा ठरतो.
 
अनैसर्गिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही. संभोग केवळ प्रजननासाठी केला पाहिजे या धारणेमुळे या कायद्याचा फटका गे अर्थातच समलैंगिक पुरुष, लेस्बियन अर्थात समलैंगिक स्त्रिया, बायसेक्शुअल म्हणजे उभयलिंगी पुरुष आणि स्त्रिया आणि ट्रान्सजेंडर्स यांना बसला. एवढेच नव्हे तर या कायद्यानुसार प्रौढ जोडप्यांनी संमतीने संबंध ठेवणे गुन्हा ठरतं कारण याने प्रजनन होणार नाही. या सगळ्यांना एकत्र LGBT असं म्हटलं जातं.