Festival Posters
✕

पर्यटन, खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले प्रगत शहर इंदूर मध्य प्रदेश

Updated: गुरूवार, 29 मे 2025 (20:46 IST)
भेट देण्याची वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5, प्रवेश मोफत 
 
अन्नपूर्णा मंदिर-अन्नपूर्णा मंदिर हे दक्षिण भारतीय मंदिर शैलीने प्रेरित असून अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे. अतिशय सुंदर असे नक्षिकाम आणि दक्षण भारतीय शैलीत हे मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात विष्णू, शिव आणि हनुमान मंदिरेही आहे. येथे नेहमी शांत आणि धार्मिक वातावरण असते. 
 
नैसर्गिक आणि मनोरंजन स्थळे
पातालपाणी धबधबा- इंदूर शहरापासून पासून 35 किमी अंतरावर, माळव्यातील हा 
प्रसिद्ध धबधबा आहे. तसेच हे ठिकाण पावसाळ्यात विशेष आकर्षक, पिकनिक आणि ट्रेकिंगसाठी योग्य मानले जाते 
 
रालमंडल वन्यजीव अभयारण्य-इंदूरपासून 12 किमी, पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. या अभयारण्यात हरण, सांबर, नीलगाय यांसारखी वन्यजीव पाहावयास मिळतात आणि  ट्रेकिंगसाठी उत्तम आहे 
भेट देण्याची वेळ: सकाळी 8 ते सायंकाळी 6, प्रवेश शुल्क: ₹50-100.
 
मेघदूत गार्डन-मेघदूत गार्डन हे शहरातील सुंदर उद्यान असून कुटुंबांसाठी पिकनिक स्पॉट करीत प्रसिद्ध आहे येथे संगीतमय कारंजे, मुलांसाठी खेळणी आणि बोटिंग सुविधा उपलब्ध आहे 
 
सेंट्रल म्युझियम-परमार आणि होळकर राजवंशाच्या पुरातन वस्तू आणि शिल्पे येथे पाहावयास मिळतात 
तसेच मध्य प्रदेशच्या इतिहासाची झलक येथे दृष्टीस पडते 
भेट देण्याची वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5, प्रवेश शुल्क: ₹10-50.

इंदूरच्या जवळपासच्या पर्यटन स्थळे
उज्जैन (55 किमी): महाकालेश्वर मंदिर आणि कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध.
महेश्वर (90 किमी): नर्मदा नदीकाठ, अहिल्याबाई होळकरांचा किल्ला.
मांडव (100 किमी): रोमँटिक आणि ऐतिहासिक स्थळ, जहाज महल आणि रानी रूपमती पॅव्हेलियन.
 
आधुनिक आणि खरेदी स्थळे
सार्वजनिक बाजार आणि खरेदी-पारंपरिक माहेश्वरी आणि चंदेरी साड्या, ड्रेस, दागिने आणि हस्तकला हे इंदूरच्या बाजाराचे खास वैशिष्ट्ये आहे तसेच शहरातील एमटी क्लॉथ मार्केट हे कापड आणि साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. 
 
खाद्यसंस्कृती-इंदूरला "फूड कॅपिटल ऑफ इंडिया" म्हणतात, आणि येथील खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच इंदूर मध्ये पोहा-जलेबी हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय आहे. तसेच दाल-बाफला, भुट्टे किस हे देखील येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. तर गुलाब जामुन, रबडी आणि मालपुआ हे इंदूर मधील स्वीट डिश म्हणून प्रसिद्ध आहे तसेच इंदूरचे नमकीन जे जगभर प्रसिद्ध आहे. 
 
प्रसिद्ध ठिकाणे-
छप्पन दुकान: 56 दुकानांचा फूड स्ट्रीट, विविध खाद्यपदार्थांसाठी आहे. 
सराफा बाजार: रात्रीच्या वेळी स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. 
 
सण आणि उत्सव
रंगपंचमी: होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणार उत्सव ज्यात रंग उधळून गेर काढली जाते.
गणेश चतुर्थी: मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भव्य मिरवणुका निघतात. 
तानसेन संगीत समारोह: डिसेंबरमध्ये, शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो. 
 
इंदूरचे वैशिष्ट्य
स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील अव्वल शहर.
माळवी संस्कृती, आतिथ्य आणि खाद्यपदार्थांचा अनोखा संगम.
शैक्षणिक केंद्र: IIT आणि IIM इंदूर येथे.
इंदूर हे इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि खाद्यपदार्थांचे परिपूर्ण मिश्रण आहे. पर्यटकांसाठी हे शहर प्रत्येक दृष्टिकोनातून अविस्मरणीय अनुभव देते.
 
इंदूर कसे जावे? 
हवाई मार्ग-देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले असून येथून तुम्ही कॅपच्या मदतीने शहरात येऊ शकतात. 
रेल्वे मार्ग-इंदूर जंक्शन, मुंबई, दिल्ली, कोलकाता यांना जोडलेले आहे. 
रस्ता मार्ग- NH-47 आणि NH-59 ने जोडलेले असून बस आणि टॅक्सी उपलब्ध आहे. 
 
इंदूर पर्यटन टिप्स
सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च, हवामान सौम्य असते.
स्थानिक वाहतूक: ऑटो रिक्षा, ओला-उबर, सिटी बस उपलब्ध आहे. 

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

बिपाशा बसूच्या प्रोटीन पावडरमध्ये सापडले किडे! अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदतीचे आवाहन केले

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

आंध्र प्रदेशातील कानिपकम मंदिरात गणपती बाप्पा विहिरीतून प्रकट झाले; गणेशोत्सव पर्वात दर्शन घेणे शुभ

प्रसिद्ध गायकाच्या वाहनावर गोळीबार

पुढील लेख
Show comments