Daily Horoscope
✕

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

Updated: सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 (08:03 IST)
 

इतिहास  

हे मंदिर १० व्या किंवा ११ व्या शतकातील (इसवी सन ९५० ते १०५० दरम्यान) असल्याचे मानले जाते. या मंदिराचे निर्माण कल्चुरी वंशाचे राजा युवराज देव यांनी केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. हे मंदिर त्याकाळी 'गोलकी मठा'च्या आचार्यांसाठी (संतांसाठी) भेट म्हणून बांधले गेले होते.
 

पौराणिक संदर्भ 

स्थानिक लोककथेनुसार, हे क्षेत्र महाभारतातील विराट नगर (मत्स्य देश) होते. असे मानले जाते की, पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाचा काळ येथेच व्यतीत केला होता. या पौराणिक संबंधामुळेच या मंदिराला 'विराट मंदिर' असे नाव पडले. येथे भगवान शिवाची पूजा विराटेश्वर (विशाल स्वरूप असलेला) म्हणून केली जाते. तसेच अर्जुनाच्या बाणाने गंगा सोडली, ज्यामुळे बाणगंगा कुंड तयार झाला (म्हणूनच बाणगंगा हे नाव पडले). पांडवांनी येथे स्वतःचे कुंड देखील बांधले. मंदिराजवळ पवित्र बाणगंगा कुंड आहे, जिथे भाविक स्नान करतात. 
 

वास्तुकला आणि वैशिष्ट्ये

या मंदिराची वास्तुकला खजुराहो येथील मंदिरांशी मिळतीजुळती आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर विविध देवी-देवता, अप्सरा आणि काही कामुक (Erotic) शिल्पे अतिशय सुंदररीत्या कोरलेली आहेत. हे मंदिर साधारण ७०-७२ फूट उंच असून एका उंच चबूतऱ्यावर उभे आहे. तसेच मुख्य मंदिर गर्भगृहात एक छोटेसे पण अतिशय पवित्र शिवलिंग आहे आणि असे मानले जाते की येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात. सूर्याचे पहिले किरण शिवलिंगावर पडतात. येथे भगवान गणेश (नृत्य मुद्रेत), कार्तिकेय, सरस्वती, विष्णू आणि शिव-पार्वतीच्या अनेक कोरीव मूर्ती आहे.
 

बाणगंगा मेळा

येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी किंवा महाशिवरात्रीच्या आसपास 'बाणगंगा मेळा' भरतो. हा मेळा १८९५ मध्ये रिवाचे महाराज गुलाब सिंह यांनी सुरू केला होता.
ALSO READ: अहिल्या किल्ला महेश्वर
सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या देखरेखीखाली आहे. काळाच्या ओघात मंदिराचे शिखर थोडे कलले आहे, तरीही याची भव्यता आणि सुंदरता टिकून आहे. हे मंदिर या प्रदेशातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे शिव मंदिर मानले जाते. श्रावण सण, महाशिवरात्री आणि जत्रांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
 

विराटेश्वर महादेव मंदिर बाणगंगा जावे कसे? 

जवळचे रेल्वे स्टेशन: शहडोल रेल्वे स्टेशन (साधारण ३-४ किमी अंतरावर).
हे शहडोल-रीवा मुख्य मार्गावर सोहागपूर बाणगंगा परिसरात आहे.
तसेच तुम्ही शहडोलहून बस/टॅक्सीने पोहोचू शकता. 
ALSO READ: ध्यानलिंगम: शिवाचे इतके सुंदर आणि अलौकिक मंदिर तुम्ही कुठेही पाहिले नसेल

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल

Boating Spots in Maharashtra नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी प्रमुख आणि निसर्गरम्य स्पॉट्स

पुढील लेख
Show comments