Marathi Biodata Maker

Chandrashekhar Azad Jayanti थोर क्रांतिकारी "चंद्रशेखर आझाद जयंती"

Updated: बुधवार, 22 जुलै 2026 (23:43 IST)
 
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ भावरा गाव, अलीराजपूर जिल्हा, मध्य प्रदेश मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जागराणी देवी होते. 
 
क्रांतिकारी कार्य
चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधींच्या १९२१ च्या असहकार चळवळीत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर ते 'हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन' (HRA) या क्रांतिकारी संघटनेत सामील झाले. पुढे पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह त्यांनी या संघटनेचे पुनर्गठन करून 'हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' (HSRA) ची स्थापना केली. तसेच काकोरी ट्रेन चोरी (१९२५) आणि सांडर्सचा वध (१९२८) यांसारख्या अनेक क्रांतिकारी घटनांमध्ये त्यांची मुख्य भूमिका होती.
 
चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते . चंद्रशेखर आझाद यांच्या पराक्रमाची गाथा भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांची शौर्यगाथा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. चंद्रशेखर आझाद यांचे सुरुवातीचे आयुष्य आदिवासीबहुल भागात भवरा गावात गेले. असहकार आंदोलनात देशभक्त असल्यामुळे चळवळीत भाग घेण्यास सोपं झालं. या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कैद करण्यात आलं. त्यांना न्यायालयात न्यायधीशांने नाव विचारल्यावर त्यांनी आपले नाव आझाद म्हणून सांगितले. तेव्हा पासून ते चंद्रशेखर तिवारी नाही तर चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखू जाऊ लागले. न्यायाधीशांच्या समोर उलट उत्तर दिल्यामुळे त्यांना चाबकाचे फटके देण्यात आले. त्यावेळी देखील ते भारत माता की जय अशा घोषणा देत होते. त्या वेळी ते अवघे 15 वर्षाचे होते. 
 
तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होत. स्वातंत्र्याच्या लढला त्यांनी आपले प्राण देशासाठी बलिदान दिले. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे त्यांचे स्वपन होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांनी इंग्रजांची खजिन्याने भरलेली काकोरी मध्ये ट्रेन लुटली. या लूट मध्ये राम प्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकूर रोशन सिंह, यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
 
तसेच चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे पुन्हा नव्याने संस्थेला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले. ओजस्वी, विद्रोही, आणि तापट स्वभावाचे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांची एक सभा आयोजित केली. येथे त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली.  
 
चंद्रशेखर आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यू नंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन संस्था पुन्हा उभारून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले. ते या संस्थेचे सर चिटणीस झाले. त्यांनी क्रांतिवीर लाल लजपत राय यांच्या मृत्यूचे बलिदान घेण्यासाठी १९२८ मध्ये आपल्या एका साथीदारांसह मिळून सॅंडर्सची हत्या केली. त्यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली त्यातून ते पळून गेले. त्यांना अनेकदा स्वातंत्र्य लढाच्या चळवळीत अटक करण्यात आली. त्यांचे निश्चय होते. की  प्राण गेले तरी चालेल पण इंग्रजांच्या हाती लागायचे नाही.  
 
वीरमरण: २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क (सध्याचे चंद्रशेखर आझाद पार्क) येथे इंग्रज पोलिसांशी झालेल्या भीषण चकमकीत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वतःच्या पिस्तुलातील शेवटची गोली स्वतःवर झाडून त्यांनी पोलिसांच्या हाती जिवंत न सापडण्याचा आपला संकल्प पूर्ण केला.  अशा प्रकारे त्यांनी देशाला स्वातंत्र्य करण्याच्या लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान आले.  
 
चंद्रशेखर आझाद जयंतीचे महत्त्व
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या तरुण वयात प्राणांची आहुती देणाऱ्या या अमर हुतात्म्याच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी २३ जुलै रोजी देशभरात विविध कार्यक्रम, भाषणे आणि रॅलींचे आयोजन केले जाते. त्यांच्या देशभक्तीने आजही तरुणांच्या मनात अभिमानाची ठिणगी पेटवली जाते.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

बदलापूरमध्ये शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एसटीने दिलासादायक प्रवास पुरवला, एनसीएमसी कार्डची आवश्यकता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

संचेती चौकात दुचाकीस्वाराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला धडक दिली, एफआयआर दाखल

रेडमी नोट 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स वर 5,000ची सूट, 10,000mAh बॅटरी आणि 3,500 निट्सचा डिस्प्ले: स्वस्त स्मार्टफोन्सनी खळबळ उडवली

पुढील लेख
Show comments