सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:38 IST)

अभिनेता विद्युत जामवाल, अनुपम खेर यांच्या दमदार ‘IB71’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता विद्युत जामवाल ‘IB71’ नावाचा दमदार चित्रपट घेऊन येत आहे. हे १९७१ मधील एका मोठ्या गुप्त मिशनच्या सत्य घटनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या मिशनसाठी ३० एजंटनी १० दिवसांत विजयासाठी तयारी केली. पाकिस्तानविरुद्ध देशाला विजय मिळवून देणारी कथा तब्बल ५० वर्षे लोकांपासून दडवून ठेवली होती. आता हीच कथा मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
 
‘IB71’ च्या ट्रेलरची सुरुवात एका विमानाने होते, ज्याचा IB एजंट विद्युत जामवाल पायलट आहे, हे विमान क्रॅश होणार आहे. आत बसलेले सगळे घाबरलेले दिसतात. कोणीतरी त्यांना लँडिंग रद्द करण्याचा सल्ला देताना आपल्याला दिसत आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor