suvichar
✕

अभिनेत्री तनुश्री दत्ता सुशांत सिंग राजपूतसोबत चित्रपट करणार होती, म्हणाली- माझ्या जेवणात....

Updated: शनिवार, 26 जुलै 2025 (21:05 IST)
 
आता तनुश्री दत्ताने आरोप केला आहे की तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तनुश्री म्हणते की तिच्याविरुद्ध एक लॉबी तयार केली जात आहे आणि काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत जे घडले ते माझ्यासोबतही घडू शकते.
 
तनुश्री दत्ताने पाच वर्षांपासून तिला होत असलेल्या छळाचा उल्लेख केला. तिने सांगितले की तिच्या इमारतीची सुरक्षा तिला न कळवता बदलण्यात आली. तिच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. एका मोलकरणीला जाणीवपूर्वक घरात पाठवण्यात आले होते जी तिच्या जेवणात काहीतरी मिसळत असे.
 
तनुश्री दत्ता म्हणाली, हे सर्व तिच्या मीटू चळवळीनंतर सुरू झाले. मी सुशांत सिंग राजपूतसोबत एक चित्रपट करणार होते. पण सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर असे दिसते की तिच्या आणि सुशांतच्या त्रासांमध्ये खोल संबंध होता.
 
तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये तिच्याविरुद्ध एक लॉबी तयार केल्याचा आरोप केला. तिने म्हटले की हे सर्व मला वेडा बनवण्यासाठी केले जात आहे. सुशांत सिंग राजपूतसोबत जे काही घडले ते माझ्यासोबतही घडत आहे. एक लॉबी आहे जी मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. माझे प्रोजेक्ट हिसकावून घेतले जात आहेत. माझ्याकडे येणारे अनेक प्रोजेक्ट आले नाहीत. या लोकांनी एका निर्मात्याला धमकावले आणि त्याला नकार दिला.असे देखील तनुश्री म्हणाली. 
ALSO READ: Nazar Battu Song Release: ''सन ऑफ सरदार 2'चे नजर बट्टू गाणे रिलीज
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments