शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (12:06 IST)

'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज, प्रभास दिसला राम अवतारात

prabhas
साऊथ सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाला आहे. अयोध्येत एका शानदार सोहळ्यात चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. समोर आलेल्या टीझरमध्ये प्रभास भगवान राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसत आहे.
 
‘आदिपुरुष’चित्रपटाची कथा रामायणापासून प्रेरित आहे. टीझरची सुरुवात प्रभासच्या आवाजाने होते. तो म्हणतो, 'ही पृथ्वी कोसळली किंवा हे आकाश तुटले तर न्यायाच्या हातून अन्यायाचा नायनाट होईल. मी येतोय, मी येतोय, अन्यायाची दहा डोकी दोन पायांनी चिरडून टाकायला. मी अधर्माचा नाश करायला येत आहे.'
 
टीझरमध्ये लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान खूपच दमदार दिसत आहे. टीझरमध्ये हनुमान, सुग्रीव, बली आणि जटायू देखील दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
आदिपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited by : Smita Joshi